नागरिकांशी आणि व्यापाऱ्यांशी गैरवर्तन व शिवीगाळ करणारे 4 पोलीस निलंबित
पुणे : खरा पंचनामा
गुन्हे शाखेतील कॉप्स २४ बीट मार्शल म्हणून नेमणुकीला असलेल्यांनी 'आम्ही पोलीस आहे, आमचे कोणी काहीही करु शकत नाही आमचेकडे पैसे मागितले तर तुम्हाला हद्दीत धंदा करु देणार नाही,' असे दारुच्या नशेत बोलून लोकांना आणि व्यापाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या व शिवीगाळ करणाऱ्या चार बीट मार्शल यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी हा आदेश दिला आहे.
पोलीस अंमलदार योगेश सुरेश माळी, मुकेश श्रीधर वाळले, शंकर दत्ता धोत्रे, कैलास शेषश्राव फुपाटे अशी निलंबित केलेल्या पोलीस अंमलदारांची नावे आहेत.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी रोड पोलीस चौकी येथे ११ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हद्दीतील काही नागरिक व व्यापारी चौकीस आले. त्यांनी कळविले की, विश्रांतवाडी पोलीस ठाणे येथे कर्तव्यास असणारे पोलीस अंमलदार योगेश माळी, मुकेश वाळले, शंकर धोत्रे, कैलास फुपाटे हे दारु पिऊन आले. त्यांनी आम्ही पोलीस आहे, आमचे कोणी काहीही करु शकत नाही, आमचेकडे पैसे मागितले तर तुम्हाला हद्दीत धंदा करुन देणार नाही, असे बोलून नागरिकांशी गैरवर्तन व शिवीगाळ केली आहे.
त्यानंतर १२ नोव्हेबर रोजी सकाळी १० वाजता हजेरीवर याबाबत विचारणा केली असताना त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिलेले नाही. त्याबाबत पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दैनदिनीत नोंद घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार पोलिसांनी कर्तव्यावर असताना बेजबाबदार, बेफिकीर व जनमानसांत पोलिसांची प्रतिमा मलिन व नैतिक अधःपतनाचे गैरवर्तन केल्याने पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी त्यांना निलंबित केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.