Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली जेलमधून पळालेल्या खुनातील संशयित अजय भोसलेला अटकजयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने मिरज शहर पोलिसांची उदगाव मध्ये कारवाई

सांगली जेलमधून पळालेल्या खुनातील संशयित अजय भोसलेला अटक
जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने मिरज शहर पोलिसांची उदगाव मध्ये कारवाई

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या खुनातील संशयिताला शिरोळ तालुक्यातील उदगाव येथून पकडण्यात आले. जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने मिरज शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

मिरजेतील कुणाल बाली याच्या खुनातील मुख्य सूत्रधार अजय दाविद भोसले (वय 35 वर्षे, रा.संजय गांधी झोपडपट्टी, तासगाव वेस, मिरज) हा दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी सांगली जेलमधून पळून गेला होता. त्याला शोधण्यासाठी मिरज शहर तसेच सांगली एलसीबीची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली होती.

मिरज शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक किरण चौगले यांना सोमवारी सकाळी अजय भोसले उदगाव बसस्थानक परिससरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी तसेच दीपक परीट यांना पाठवले. परीट यांच्यासह पथकाने जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.