Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात

भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात

पालघर : खरा पंचनामा

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असताना पालघरमध्ये साधूची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेवरून राज्यात भाजपनं महाविकास आघाडीविरोधात जोरदार मोहिम राबवली. त्यावेळी भाजपनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्या नेत्यावर आरोप केले होते त्याच नेत्याला आता पक्षात घेतलंय.

काशिनाथ चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह डहाणूत एका कार्यक्रमात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

डहाणूत शिवेसना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट भाजपविरोधात एकत्र आलेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटना घडत असताना शरद पवार गटातील काशिनाथ चौधरी यांनी भाजप प्रवेश केलाय. त्यांसोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजप प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाला भाजप खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आमदार हरिश्चंद्र भोये आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हेसुद्धा उपस्थित होते.

पालघरमध्ये १६ एप्रिल २०२० रोजी साधूची हत्या करण्यात आली होती. या घटनेवेळी तेव्हा भाजपने काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिंदेंनी मविआत बंड करण्याचं हेच कारण असल्याचं सांगण्यात आलं होतं. जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात २ साधू आणि एका वाहनचालकाची हत्या करण्यात आली होती. तेव्हा या प्रकरणी २०० जणांना ताब्यात घेतलं होतं.

साधूंच्या हत्याकांडाच्या घटनेवेळी काशिनाथ चौधरी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते. त्यावेळी साधूंच्या हत्याकांडाचा सूत्रधार काशिनाथ चौधरी असल्याचा आरोप भाजपने केला होता. आता त्याच चौधरींना भाजपने पक्षात घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.