'महायुतीत भाजपने पाठीत खंजीर खुपसला; ही तर कार्यकर्त्यांची भावना'
सोलापूर : खरा पंचनामा
स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना एकमेकांविरोधात लढली तरी शत्रू फक्त महाविकास आघाडीच असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक लढवत असल्याचा शिंदे यांनी दावा केला आणि आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील योजनांचे कौतुक केले. राजकीय टीकांवर प्रत्युत्तर देत शिंदे यांनी विरोधकांवर अहंकार आणि असूयेचे आरोप केले.
महायुतीत असूनही भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याची भावना धाराशिवच्या शिवसैनिकांनी बोलून दाखवली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी भाष्य करताना 'ह्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना असतात' असे म्हटले आहे. निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात लढलो म्हणजे मित्राचे शत्रू झालो, असे नाही. आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच आहे आणि तोच राहणार आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (ता. 23 नोव्हेंबर) सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, मोहोळ आणि सांगोल्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाष्य केल्याचे मानले जात आहे.
शिंदे म्हणाले, ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे. लोकसभेला नरेंद्र मोदींसाठी आम्ही एकत्र होतो. विधानसभेला महायुती जिंकली. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणूक लढण्याच्या भावना असतात, त्यामुळे आम्ही एकमेकांविरोधात लढलो म्हणजे मित्राचे शत्रू नाही झालो. आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीचा आहे आणि तोच राहणार आहे.
आम्ही विकासाच्या मुद्द्यावर नगरपालिका निवडणूक लढवतोय. या नगर परिषदेमध्ये विकासाची कामे झाली पाहिजेत. सर्वसामान्य माणसांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. ही शिवसेनेची भूमिका राहिली आहे. माझा जो मुख्यमंत्रिपदाचा अडीच वर्षांचा कालावधी होता, त्यात विकासालाच प्राधान्य दिले. लाडकी बहीण योजना आणि विकास यांची मी सांगड घातली, त्यामुळे विधानसभेला प्रचंड बहुमत मिळालं, असा दावा शिंदेंनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.