Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रशिक्षणार्थी पीएसआयचा मैत्रिणीवर अत्याचारबलात्कारासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

प्रशिक्षणार्थी पीएसआयचा मैत्रिणीवर अत्याचार
बलात्कारासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

छत्रपती संभाजीनगर शहरात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मैत्रिणीवर कॅफेत नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अत्याचारानंतर पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने गर्भपात करायला भाग पाडलं. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पीएसआय भागवत ज्ञानोबा मुलगीर (रा. परभणी) याच्यावर बलात्कारासह अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय तरुणी ही मूळची परभणी जिल्ह्यातील असून शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. आरोपी भागवत मुलगीर हा देखील परभणी जिल्ह्यातला असून दोघेही एकाच ठिकाणी तयारी करत असल्याने त्यांची ओळख झाली आणि काही दिवसांतच ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. यातूनच फेब्रुवारी २०२४ मध्ये आरोपी भागवतने तरुणीला अजबनगर कमानीसमोर असलेल्या एमएच-२० कॅफेत नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार करून शरीरसंबंध प्रस्थापित केले.

या संबंधातून पीडित तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर भागवतने त्यांचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि गर्भपात करण्यास बळजबरी केली. या घटनेनंतर भागवत हा पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि त्याने पीडितेला फोनवर ब्लॉक केलं. पीडितेने हा सर्व प्रकार भागवतची बहीण आणि वडिलांना सांगितल्यानंतर, त्यांनी 'तुला जे करायचे ते कर' असे म्हणत उलट तिलाच धमकावलं. अखेर पीडित तरुणीने क्रांती चौक पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी भागवत मुलगीर याच्यासह त्याचे वडील आणि बहिणीलाही सहआरोपी केले असून, आरोपी पीएसआयचा शोध घेतला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.