Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका"

"सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका"

पुणे : खरा पंचनामा 

पुण्यातील रामवाडी पोलिस चौकीच्या उद्घाटन प्रसंगी पोलिस अमितेश कुमार यांच्यासह पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी भाषणात अमितेश कुमार यांनी नेहमीप्रमाणे अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी अमितेश कुमार बोलताना म्हणाले, रामवाडी पोलीस चौकीचे आज उद्घाटन झालं याबद्दल सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. समस्यांचे निरसन पारदर्शकपणे "स्वच्छ" करण्यात येईल. परिणामकारक तुम्हाला सगळ्यांना दिसेल.

अधिकाऱ्यांना सूचना देताना आयुक्त म्हणाले, "अधिकारी यांना सांगतो की लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत परिणामकारक सुधार घडवून आणायला लागेल. पोलिस अधिकाऱ्यांना सूचना आहे की रामवाडी मधील अवैध धंदे उद्या सूर्योदयाच्या पूर्वी तोडून टाका. मन परिवर्तन करा नाहीतर खाकी भाषेतून त्यांचे मन परिवर्तित करा. एक थेंब अवैध दारू विकू देणार नाही, अंडा बिन्ड काही विकू देणार नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले, "तुमच्या केसाला पण धक्का लागू देणार नाही, प्रथम अवैध धंदा बंद करा, हा परिसर स्वच्छ झाला पाहिजे. जे गुन्हेगार आहेत त्यांची नावं शोधा आणा आणि बसवा. रस्त्यात असलेल्या भंगार व्यवसाय असेल तर तो काढून टाका फालतू टपरी लावून चालू देणार नाही. घरात मन न लागणारे लोकं आहेत ते थर्ड क्लास आहेत त्यांना पूर्णपणे स्वच्छ करायला पाहिजे. कारवाई आम्ही अशी करू की सात पिढ्या लक्षात ठेवतील."

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.