"तुम्ही करणार असाल तर आम्ही चालवून घ्यायचं आणि भाजपने केलं तर ते चालणार नाही असं होणार नाही"
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे काही मंत्री हे भाजपवर नाराज असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे काही मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सुद्धा गेल्याची माहिती सूत्रांकडून कळते.
यावेळी कल्याण डोंबिवली आणि इतर जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील लोकांना भाजपाकडून फोडले जात आहे याबाबत या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीला शिवसेनेचे काही मंत्री उपस्थित होते. त्यांनी डोंबिवली येथील शिंदे गटाच्या नेत्यांचा भाजप प्रवेश होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कडक भूमिका घेत शिवसेनेच्या मंत्र्यांनाच सुनावलं. त्यांनी उल्हासनगरमध्ये तुम्हीच सुरूवात केली. तुम्ही करणार असाल तर आम्ही चालवून घ्यायचं आणि भाजपने केलं तर ते चालणार नाही असं होणार नाही. असं सांगत त्यांनी इथून पुढे एकमेकांच्या नेते अन् कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नका पण दोन्ही पक्षांनी ही पथ्य पाळली पाहिजेत असं देखील सुनावलं.
दरम्यान, शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी प्री कॅबिनेट बैठकीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केली होती. भाजप युती धर्म पाळत नसल्याची सर्व मंत्र्यांची तक्रार होती. निषेध म्हणून एकनाथ शिंगे यांच्या गटाचे काही मंत्री कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मंत्री संजय शिरसाट देखील मुख्यमंत्र्यांना भेटून निघून गेले. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.