मालगावच्या कोतवालास दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
सरबांध रस्ता सुनावणीच्या अनुकूल अहवालासाठी घेतले पैसे : सांगली एसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सरबांधाच्या रस्त्याबाबत तहसीलदारांकडे सुरु असलेल्या सुनावणीसाठी सकारात्मक अहवाल देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडी अंती दहा हजारांची लाच घेताना मालगाव (ता. मिरज) येथील कोतवालास (महसूल सहायक) याला रंगेहात पकडण्यात आले. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली.
मामासो तिप्पाण्णा कांबळे (वय ५३, रा. मालगाव गणेश कॉलनी गणेश मंदिराजवळ) असे त्या कोतवालाचे नाव आहे. तक्रारदार यांची पत्नी व मालगाव येथील अर्जदार शेतकरी यांच्यात तहसिलदारांच्या कोर्टात सरबांधाचे रस्त्याबाबत सुनावणी सुरु आहे. कोतवाल कांबळे यांनी सुनावणीचा केसमध्ये तलाठी व मंडल अधिकारी यांच्या सहीचा सकारात्मक अहवाल पाठवून खटल्याचा निकाल तक्रादारांच्या बाजुने लागण्यासाठी सहाय्य करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 15 हजार रुपचे लाचेची मागणी केलेबाबतचा अर्ज तक्रारदार यांनी सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग दिला होता.
तक्रार अर्जाची पडताळणी केल्यावर कांबळे यांनी दहा हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोमवारी एसीबीने सापळा रचून लाच घेताना रंगेहात पकडले.
सांगली एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश चव्हाण, निरीक्षक किशोरकुमार खाडे, अजित पाटील, चंद्रकांत जाधव, प्रितम चौगुले, पोपट पाटील, उमेश जाधव, ऋषिकेश बडणीकर, सलिम मकानदार, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे, सीमा माने, विणा जाधव, चालक विठ्ठलसिंग रजपुत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.