Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने डॉ. पै.तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवसानिमित्त गोशाळेत चारा वाटप

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने डॉ. पै.तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवसानिमित्त गोशाळेत चारा वाटप

इचलकरंजी : खरा पंचनामा

संपूर्ण भारतभर समाजसेवा संघटन शक्ती आणि जनसंपर्क यासाठी ओळखले जाणारे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै. डॉ. तानाजीभाऊ जाधव यांनी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व सोलापूर परिसरात भीषण पावसाळामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डॉ. पै. तानाजीभाऊ जाधव यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी यावर्षी वाढदिवस कोणत्याही ठिकाणी साजरा करू नका. सामाजिक उपक्रम राबवा या माध्यमातून माझा वाढदिवस साजरा करा. असे सर्वांना आवाहन केले होते. 

त्यानुसार टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै. डॉ. तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी टायगर ग्रुपच्या वतीने एक सामाजिक उपक्रम हाती घेतला. टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद जालिंदरभाऊ जाधव व धाराशिव जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिनभैय्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोशाळेत चारा वाटप कार्यक्रम पार पडला. इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने पै. डॉ. तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभाव आणि समाजोपयोगी कार्याचा संदेश देण्यात आला. 

या समाजोपयोगी कार्यक्रमासाठी टायगर ग्रुप चे रणजीत म्हेतर ,सतीश जाधव, गुरुराज जोळद ,अवधूत जगताप, कृष्णांत बडवे , संदीप पाटील,प्रकाश हुलमणी ,रोहित जाधव, नामदेव हुलमणी ,दगडू जाधव, शंकर हुलमणी,आशिष चांडक, उत्तम पाटील, गणेश म्हेतर ,शंतनु हुलमणी, राजवीर उर्फ टायगर म्हेतर,आर्यन व्हनबट्टे व सदस्य उपस्थित होते. टायगर ग्रुप देशभरात सामाजिक आणि सेवाभावी कार्यासाठी ओळखला जातो आणि चारा वाटप कार्यक्रम याच परंपरेचा एक भाग होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.