पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणांवरुन चुलत भावाचा गळा चिरुन हत्या करणाऱ्या आरोपींस ठोकल्या बेड्या !
भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी
माधवी गिरीगोसावी
पुणे : खरा पंचनामा
महाराष्ट्रात सध्या अनैतिक संबंधातून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये चांगलीच वाढ होत असताना दिसून येत आहे. विश्वासांच्या पायावरच कोणतही नातं उभं असतं. मग ते मित्र-मैत्रिणीचं असो, भावा बहिणीचं किंवा पती-पत्नीचा एकदा का विश्वास मोडला तर त्या नात्याला तडा जायला क्षणभरांचाही विलंब लागत नाही. प्रेमात पडलेला माणूस काही करू शकतो असं म्हणतात आणि हे प्रेम दुसऱ्यासाठी जीवघेणं ठरतं आणि मग जेलची हवा खायला देखील भाग पाडतं. भारती विद्यापीठ पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये देखील पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून चुलत भावाकडुंन रक्तरंजित खेळ झाला आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणांवरून चुलत भावाचा गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपींस अखेर भारती विद्यापीठ पोलिसांनी 36 तासांत आरोपी अशोक कैलास पंडित याला बेड्या ठोकल्या आहेत. तर आरोपींने अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.
दिनांक १९ रोजी तक्रारदार विजय महादेव कुमार (वय. 37) लेबर ठेकेदार रा. गेडा बरखंट्टा, तहसील जिल्हा हजारीबाग राज्य झारखंड सध्या रा. लेन नंबर ३ म्हसोबा मंदीराजवळ, टिळेकरनगर कोंढवा बुद्रुक पुणे) यांनी कळविले की, त्यांचेकडील कामगार अजयकुमार गणेश पंडीत (वय 22, सध्या रा. साईनगर खोपडेनगर, कात्रज, पुणे, मुळ गांव चत्रो, जिल्हा हजारीबाग झारखंड) हा दिनांक 17 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारांस घरांमधुन गाडी घेवुन येतो असे सांगुन निघुन गेला होता. मात्र तो पुन्हा परतलाच नाही, अशी तक्रार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल होती.
सदर घटनेच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी घटनास्थळी भेट देवून तपासी पथकांतील पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक निलेश मोकाशी व अंगलदार यांना मिसींग व्यक्तीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकांचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश गोकाशी व पोलीस स्टाफ हे मिसींग व्यक्तीबाबत माहीती घेत असताना सदर घटनेबाबत काही संशयास्पद बाबी प्राप्त झाल्या व मिसींग व्यक्तीचे त्याचा चुलत भाऊ अशोक पंडीत यांचे पत्नीसोबत अनैतिक संबंधाची झालर पोलिसांना दिसून आली. त्यावरूनच दोघांमध्ये नेहमीच वादविवाद निर्माण होत होते.अशी माहीती पोलीस तपासात समोर आली.
त्या अनुषंगाने आरोपी अशोक कैलास पंडीत याचे मोबाईल नंबरचे लोकेशन तपासले असता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस अंमलदार सागर बोरगे यांनी करून तो पिंपरी-चिंचवड भागात असल्याची माहीती समोर आली. तपासी पथकांतील पोलीस अंमलदार संदिप आगळे व तुकाराम सुतार यांनी पिंपरी-चिंचवड भागात जावुन अशोक पंडीत याचा शोध घेतला असता तो मिळुन आला. त्याचेकडे मिसींग व्यक्ती अजयकुमार पंडीत याचेबाबत सखोल माहिती घेतली असता. माझ्या पत्नीचे अजयकुमार गणेश पंडीत यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्या कारणांवरून खोपडेनगर येथे डोंगरांमध्ये झाडीत अजयकुमार पंडित यास गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून ठार करून त्यास गोणीमध्ये भरून गुजर निंबाळकरवाडी डोंगरामध्ये फेकून दिल्याची कबुली अखेर आरोपी अशोक कैलास पंडित याने पोलिसांना दिली. अशोक कैलास पंडीत याने गुजर, निंबाळकवाडी येथील डोंगरामध्ये झाडाझुडपात अजयकुमार पंडीत याची बॉडी जेथे पोत्यामध्ये फेकली ते ठिकाणही पोलिसांना दाखवले. अखेर भारती विद्यापीठ पोलिसांनी खूनाचा गुन्हा 36 तासांतच उघडकीस आणला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार रंजनकुमार शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात समीर शेंडे स्वप्नील पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, दिपक फसाळे, सचिन सरपाले, संदीप आगळे, तुकाराम सुतार, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, अवधुत जमदाडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, नवनाथ खताळ, निलेश खैरमोडे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.