मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या?
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील पोलीस दलातील पीएसआय ते एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या ४ वर्षांपासून रखडल्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांच्या अतिम मंजुरीअभावी प्रकिया रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयातून बदल्या मंजूर झाल्यानंतर संबंधित जिल्हा किंवा आयुक्तालयानुसार स्थानिक पातळीवरील बदल्या होतात.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 22N नुसार सर्वसाधारण बदली कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची २ वर्षांनी बदली होते. इतर शाखांतील अधिकाऱ्यांची ३ वर्षांनी बदली होते. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बदली अपेक्षित असते. मात्र, जवळपास 1000 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी ३ ते ४.५ वर्षे एकाच पोलीस ठाण्यात काम केले असूनही बदल्या नाहीत. मागील वर्षीही पीएसआय ते एपीआय स्तरावरील बदल्या न झाल्याने आता २ वर्षांचा संचय झाल्याचे समोर आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.