पोलीस अधीक्षक कार्यालयात नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक
अकोला : खरा पंचनामा
अकोल्याच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातून मोठी बातमी समोर आली आहे. पोलीस खात्यातील एका महिला क्लर्कला आपल्या चिमुकल्या नातवासमोरच लाच स्वीकारताना अटक झाली आहे. नातवासमोर आपल्याला अटक होत असताना या लाचखोर महिला क्लर्कच्या डोळ्यातून अश्रू आले. दरम्यान, आज अमरावती एसीबीने अकोला पोलीस दलातील महिला क्लर्कला लाच घेताना रंगेहात अटक केली. 'ममता संजय पाटील' असं महिला क्लार्कचं नाव आहे. 'तक्रार फाईल' पास करण्यासाठी तब्बल 20 हजार रुपयांची लाचेची मागणी ममता पाटील हिने तक्रारदाराकडं केली होती.
तक्रारदाराला लाच देणं मान्य नसल्याने थेट अमरावती एसीबी कार्यालय गाठलं. या तक्रारीवरून पडताळणी केली असता पाटील हिने लाच मागितल्याच एसीबीच्या पडताळणीत समोर आलं. त्यानंतर आज पोलीस अधीक्षक कार्यालयातच सायंकाळच्या सुमारास एसीबीने सापळा रचला. त्यानंतर ममता पाटील हिला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. मात्र, पोलीस अधीक्षक कार्यालयातच ही कारवाई झाल्याने मोठा गोंधळ या ठिकाणी उडाला होता.
तक्रारदाराचा धान्य-खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्याकड कमिशन बेसवर काम करणाऱ्या कैलास अग्रवाल याने ऑक्टोंबर 2023 मध्ये तक्रारदार यांच्या अनुमती शिवाय त्यांच्या वेअर हाउसमधील धान्य विकुन तकारदाराची फसवणूक केली. त्यावरून रामदास पेठ पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास अधिका-यांनी आरोपी कैलास अग्रवाल यांना मदत केल्यामुळे त्यांना जामीन मिळाला. असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळ तक्रारदाराने गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी, असा तक्रार अर्ज अकोल्याच्या पोलीस अधीक्षककार्यालय दिला होता.
सदर अर्जाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरुन चौकशी करून अहवाल पाठवला होता. सदर अहवालावर नोटशीट तयार करून वरिष्ठांना सादर करण्यासाठी वरिष्ठ लिपिक ममता पाटील यांनी तक्रारदाराला 20 हजार रुपये मागणी केली. नोटशीट पुटअप करण्यापुर्वी 10 हजार रुपये आणि नोटशीट पुटअप केल्यावर 10 हजार रुपये द्यावे लागणार, असं ठरलं.
सदर तक्रारीवर कारवाई करण्यासाठी एसीबीच्या वरिष्ठांनी आदेश दिल्यावरुन आज पडताळणी कारवाई केली असता अहवालावर नोटशिट पुटअप करण्यापूर्वी पाटील हिने तडजोडीअंती 8 हजार रुपये लाचेची मागणी करुन स्वीकारले. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल किनगे, पोलीस निरीक्षक, चित्रा मेसरे, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या सह आदींनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.