Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'ज्यांच्या सभेला खुर्चा रिकाम्या होत्या त्यांचं सरकार आलं'

'ज्यांच्या सभेला खुर्चा रिकाम्या होत्या त्यांचं सरकार आलं'

मुंबई : खरा पंचनामा

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने तब्बल २०२ जागा जिंकत मोठा विजय मिळवला, तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त ३५ जागांवरच समाधान मानावं लागलं.

त्यामुळे बिहार निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना बिहारच्या निवडणुकीबाबत भाष्य केलं. 'ज्यांच्या सभेला खुर्चा रिकाम्या होत्या त्यांचं सरकार आलं', अशी खोचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

"असं आहे की आपले मुख्यमंत्री म्हणाले की जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनण्यामागचं राज आजपर्यंत कोणी समजू शकलेलं नाही. बिहारच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांचं अभिनंदन. मात्र, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की तेजस्वी यादव यांच्या सभेला जो मिळणारा प्रचंड प्रतिसाद होता, मग तो प्रतिसाद खरा होता की एआयने तयार केलेली माणसे होती, हे आता कळेना झालंय. म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचं सरकार येतंय. या नवीन लोकशाहीतील हे गणित कळण्याच्या पलिकडचं आहे", असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

बिहारमध्ये महिलांना १० हजार रुपये देण्याच्या योजनेच्या फॅक्टरबाबत प्रश्न विचारला असता यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, "हा एक फॅक्टर झाला. याचा कदाचित काहीसा फरक पडलाही असेल. पण तेथील लोक ज्या समस्या भोगत आहेत, ते एवढ्या लवकर बदलतील असं वाटत नाही. पण आता ठिक आहे की, जो जीता वही सिकंदर", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.