"'मत चोरी'तून सत्तेत आलेल्या सरकारची 'जमीन चोरी'"
नवी दिल्ली : खरा पंचनामा
पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले आहेत. पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे शहरातील मुंढवा परिसरात ४० एकर जमिनीशी संबंधित प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे.
विरोधकांनी या प्रकरणावरून पार्थ पवार यांना लक्ष्य करत महायुती सरकावर हल्लाबोल केला आहे. त्यातच आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मतचोरीमधून सत्तेत आलेल्या सरकारची जमीन चोरी असे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, "महाराष्ट्रात, दलितांसाठी राखीव असलेली १८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन एका मंत्र्यांच्या मुलाच्या कंपनीला फक्त ३०० कोटी रुपयांना विकण्यात आली. त्यासोबतच, स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्यात आली म्हणजे लूट आणि कायदेशीर मंजुरीचा शिक्का!" असे म्हटले.
पुढे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, "मतांच्या चोरीतून स्थापन झालेल्या सरकारची ही 'जमीन चोरी' आहे. त्यांना माहित आहे की त्यांनी कितीही लुटले तरी ते मते चोरून पुन्हा सत्तेत येतील. त्यांना लोकशाहीची, जनतेची किंवा दलितांच्या हक्कांची पर्वा नाही. मोदीजी, तुमचे मौन बरेच काही सांगते- तुम्ही गप्प आहात कारण तुमचे सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या त्याच लुटारूंवर अवलंबून आहे? असे म्हणत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.