Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'मी CP ना सुद्धा भित नाही, तुझा आज मर्डर करतो' असे सहकाऱ्याला म्हणणारा पोलीस अंमलदार निलंबित

'मी CP ना सुद्धा भित नाही, तुझा आज मर्डर करतो' असे सहकाऱ्याला म्हणणारा पोलीस अंमलदार निलंबित

पुणे : खरा पंचनामा 

कोर्ट कंपनीमध्ये नेमणुकीला असलेल्या व न्याय बंदी यांना न्यायालयात नेण्यासाठी बंदोबस्तावर असताना सहकारी पोलीस अंमलदाराला "तुम्ही माजी सैनिक काय कामाचे नाही, माझ्यावर यापूर्वी २ केसेस आहेत.

मी सी पीं ला सुद्ध भित नाही," अशी धमकी देऊन रस्त्यावरील दगड उचलून मारण्यासाठी धावून जाऊन भर रस्त्यात अश्लिल शिवीगाळ करणार्या पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी निलंबित केले.

केशव महादु इरतकर असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्याची कोर्ट कंपनी येथे नेमणूक करण्यात आली होती. हा प्रकार येरवडा मध्यवती कारागृहाच्या परिसरामध्ये भर रस्त्यावर ११ नोव्हेंबर २०२५ रोजी घडला होता.

पोलीस अंमलदार केशव इरतकर याची न्यायबंदी यांच्या पेशीकरीता बंदोबस्तावर नेले होते. येरवडा कारागृह परिसरामध्ये पोलीस अंमलदार संदिप नाळे यांना "तुम्ही माजी सैनिक काय कामाचे नाही, तुला बघुन घेईन, तुझा आज मर्डर करतो, तुला माहिती नाही मी कोण आहे. माझ्यावर यापूर्वी २ केसेस आहेत. मी सी पी ला सुद्धा भित नाही" अशी धमकी दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक घायगुडे हे त्याला कोर्ट कंपनी कार्यालयाकडे घेऊन जात असताना केशव इरतकर याने रस्त्यावरील दगड उचलून नाळे यांना मारण्यासाठी त्यांचे अंगावर धावून गेले. अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा अहवाल कोर्ट कंपनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांना १३ नोव्हेंबर रोजी पाठविला होता.

एक जबाबदार पोलीस अंमलदार म्हणून कायद्याची माहिती असताना आणि सोबत कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार यांना सौजन्याची वागणूक देणे अपेक्षित असताना सार्वजनिक ठिकाणी अपमानजनक वागणूक देऊन, दगडाने मारण्याचा प्रयत्न करुन तसेच खुन करण्याची धमकी देऊन बेशिस्त, बेजबाबदार आणि सार्वजनिक ठिकाणी शिस्तबद्ध असलेल्या पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे अशोभनीय वर्तन केल्याने पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी केशव इरतकर याला निलंबित केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.