Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तक्रार मागे घेण्यासाठी चक्क तहसीलदारालाच मागितली 15 लाखांची खंडणीमंडल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

तक्रार मागे घेण्यासाठी चक्क तहसीलदारालाच मागितली 15 लाखांची खंडणी
मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल 

धाराशिव : खरा पंचनामा

तुळजापूर महसूल विभागात खळबळ उडवणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, तहसीलदारालाच त्यांच्या अधीन असलेल्या मंडल अधिकाऱ्यांनी खंडणीची मागणी केल्याचे उघड झाले आहे.

तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांना ब्लॅकमेल करून तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल 15 लाख रुपये मागितल्याप्रकरणी मंडल अधिकारी दिनेश बहिरमल आणि वकील बालाजी बोडके यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदार अरविंद शंकरराव बोळंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. बोळंगे तुळजापूर येथे कार्यरत असून त्यांच्या अंतर्गत आरळी बु. येथील मंडळ अधिकारी म्हणून दिनेश बहिरमल प्रतिनियुक्तीवर काम करत होते. बहिरमल यांनी एसबीआयचे क्रेडिट कार्ड घेतले होते, ज्याची सुमारे 4 लाखांची थकबाकी होती. बँकेच्या वसुली ज्याची सुमारे 4 लाखांची थकबाकी होती. बँकेच्या वसुली कॉल्सपासून वाचण्यासाठी त्यांनी 'कार्यालय प्रमुख' म्हणून बोळंगे यांचा मोबाईल नंबर बँकेला दिला.

विधानसभा निवडणुकीचे काम सुरू असताना बोळंगे यांना बँकेकडून वारंवार फोन येऊ लागले. त्यामुळे त्यांनी बहिरमल यांना जाब विचारला, मात्र उलट बहिरमल यांनी आनंदनगर (धाराशिव) पोलिस ठाण्यात बोळंगे यांनी शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार दाखल केली, ज्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला.

यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी बहिरमल आणि त्यांचे वकील बालाजी बोडके यांनी बोळंगे यांच्याकडे पैशांची मागणी सुरू केली. सुरुवातीला 15 लाखांची मागणी करण्यात आली, नंतर ती कमी करून 10 लाख रुपये आणि माफीनामा अशी अट ठेवली. अखेरीस "माफीनामा नको, पण 2 लाख रुपये द्या" अशी मागणी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे करण्यात आली.

6 डिसेंबर रोजी बहिरमल आणि बोडके हे बोळंगे यांच्या तुळजापूर येथील घरी गेले. तिथे त्यांनी पैसे जमा करण्यासाठी शहाजी अभिमान कांबळे यांच्या बँक खात्याचा तपशील व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि "पैसे दिल्यास पुढे काही त्रास होणार नाही" असे सांगितले.

या सततच्या धमक्या, मानसिक त्रास आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून मंडल अधिकारी दिनेश बहिरमल आणि अॅड. बालाजी बोडके यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 308 (3) (खंडणी) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कांबळे करत आहेत. एका मंडल अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ तहसीलदारालाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.