फायनान्स एजन्सीचे वसूली एजंट असल्याचे भासवून वाहने अडवून लुटणारी चौघांची टोळी जेरबंद
दोन दुचाकीसह 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
पहा व्हिडीओ
सांगली : खरा पंचनामा
फायनान्स एजन्सीचे चमूली एजंट म्हणून भासवून फायनान्स असणा-या वाहनाचे चालकास त्यांचे वाहन पार्कींग यार्डमध्ये अटकावून ठेवण्याची धमकी देवून त्यांचे पैसे तसेच इतर वस्तू बळजबरीने लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन दुचाकीसह 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
विपूल किशोर भोरे (वय २५, रा. एमएसईची बोर्डजवळ, स्फूर्ती चौक, सांगली), आलोक परशुराम वायदंडे, (वय १९, रा. तानंग, ता. मिरज), मयुरेश दिपक मोटे (वय २०, रा. रामरहीम कॉलनी, संजयनगर, सांगली), राजू मनीष परीहार (वय ३०, रा. सर्वोदय पाकींग पार्ड, हॉटेल सरपंच चाड़ा जवळ, सोलापूर हायवे, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी शितलकुमार बळवंत माने (रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे त्यांचे बहीणीसह उपचारासाठी कोल्हापूर येथून मिरज सिशील हॉस्पीटल येथे त्यांची होंडा अॅक्टीवा मोपेडने कोल्हापूर ते सोलापूर हायवेने येत असताना हायवेवरील हॉटेल शंभू जवळ चार जणांनी त्यांची मोपेड अडवून अहवून ते खाजगी फायनान्स एजन्सीचे वसूली एजंट असल्याचे भासवून गाडीचे कर्जाचे हप्ते धकलेले असून ती पार्कींग यार्डमध्ये जमा करावी लागेल व त्याचा चार्ज म्हणून 12 हजार रुपये भरावा लागेल असे सांगितले. जर ते पैसे फिर्यादीने दिले नाहीत तर फिर्यादी यांचे बहीणीस हात-पाय बांधून कोंडून टाकणेची धमकी दिल्यानंतर फिर्यादीने एवढी रक्कम देण्यास असमर्थता दाखविल्याने फिर्यादीकडून गाडी सोडण्यासाठी 8 हजार रुपयांची मागणी करून सदरची रक्कम ही फिर्यादी यांचे थकीत कर्जाचे हप्त्यात जमा होणार नाहीत असे सांगून फिर्यादीकडून बळजबरीने 8 हजार रुपये ऑनलाईन घेवून फिर्यादीचे अॅक्टीचा मोपेडची नंबरप्लेट तोडून नुकसान केले. घेतलेल्या पैशाबाबत कोणास काही सांगितले तर फिर्यादी व फिर्यादीचे बहीणीस जीवे मारणेची धमकी दिल्याबाचत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरजचे पोलीस प्रशासनास माहीती मिळाली होती.
सहायक निरीक्षक शिंदे यांनी तांत्रिक माहिती आणि फिर्यादीने केलेल्या वर्णनानुसार चारही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड, उपनिरीक्षक संदीप गुरव, अभिजीत धनगर, सर्जेराव पवार, विठ्ठल मूरच, राहूल क्षीरसागर, बसवराज कुंदगोळ, मोहसिन टिनमेकर, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, साईनाथ पुजारवाड, चालक श्रेणी उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.