मिरजेतून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक
2.40 लाखांच्या 4 गाड्या जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरजेतून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2.40 लाखांच्या चार गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
आयुब अब्दुलरशीद मन्ना (वय ३४), संदीप सूर्यकांत येलूरकर (वय ३८, दोघेही रा. नम्रता कॉलनी, बुधगांव, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दुचाकी चोरट्याना अटक करण्याच्या सूचना सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. पथक चोरट्यांचा शोध घेत होते.
दोन तरुण कोल्हापूर रस्ता परिसरातील एका मंगल कार्यालयाजवळ चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून गाड्या जप्त करण्यात आल्या.
मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव, सचिन कुंभार, सूरज पाटील, बसवराज कुंदगोळ, मोहसिन टिनमेकर, विनोद चव्हाण, राजेंद्र हारगे, चालक श्रेणी उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.