Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यात 3 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात 3 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : खरा पंचनामा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. सोमवारी (२२ डिसेंबर) राज्य शासनाने तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये ठाण्याची कन्या डॉ. कश्मीरा संखे यांची नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

२०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी डॉ. कश्मीरा संखे यांची भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता नाशिक जिल्ह्यातील कळवण उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे (ITDP) प्रकल्प अधिकारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

वरिष्ठ सनदी अधिकारी शैला ए. (२००३ बॅच) यांचीही बदली करण्यात आली आहे. त्या सध्या वित्त मंत्रालयात सचिव (वित्तीय सुधारणा) म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांची नियुक्ती मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सचिव आणि विकास आयुक्त या अत्यंत महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे.

२०२३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी अरुण एम. यांची गडचिरोली जिल्ह्यातच बदली झाली आहे. यापूर्वी ते चामोर्शी उपविभागात कार्यरत होते. आता त्यांच्याकडे गडचिरोली उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.