Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'काय सांगू ताई सर्वांना मॅनेज करावं लागतं" 3 लाखांची लाच घेताना पदक विजेत्या पीएसआयला अटक

'काय सांगू ताई सर्वांना मॅनेज करावं लागतं" 
3 लाखांची लाच घेताना पदक विजेत्या पीएसआयला अटक

पुणे : खरा पंचनामा

पुणे शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव (वय 57) आणि पोलीस अंमलदार वैजनाथ संभाजी तांबोळी (बकल क्रमांक 682, वय 43) यांनी एका महिलेकडून दोन गुन्ह्यांमध्ये मदत करण्याच्या बदल्यात 3 लाख रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यापैकी 1 लाख रुपये प्रत्यक्ष स्वीकारताना एसीबीने दोघांना अटक केली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदार महिलेला "सर्वांना मॅनेज करावे लागते" असे सांगून लाच स्वीकारल्याचे नमूद करण्यात आले आहे. या वक्तव्यातून या प्रकरणात इतर वरिष्ठ अधिकारी, लोकसेवक किंवा सहकारी सहभागी आहेत का, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरोपींची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.

या प्रकरणाची दखल घेत विशेष न्यायाधीश आर. एम. शिंदे यांनी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या संदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 512/2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोविंद जाधव हे पोलीस पदक विजेते असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस खात्यातील जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे लाच स्वीकारली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, आणखी कोणाची भूमिका आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.