Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भरवर्गात शिक्षकांसमोर दहावीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरला

भरवर्गात शिक्षकांसमोर दहावीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरला

पुणे : खरा पंचनामा

पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये लहान मुलांचे भयंकर गँगवॉर पाहायला मिळाले. इयत्ता 10 वीच्या वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतानाच एका मुलाने त्याच्या क्लासमेटचा गळा चिरला. वर्गातच झालेल्या या चाकू हल्ल्याने एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थानामुळे ओळख असलेलं राजगुरुनगर हे शहरसध्या वाढत्या हिंसाचारामुळे चर्चेत आहे. आज सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगरमधील एका खाजगी क्लासमध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादातून एका विद्यार्थ्याने वर्ग मित्रावर चाकूने हल्ला केला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थ्याला शेजारी राहणाऱ्या एका युवकाने तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. मृत विद्यार्थी हा एकुलता एक होता, दोन दिवसांपूर्वीच त्याला मारहाणही झाली होती, मात्र याबाबत त्यांना सांगण्यात आले नव्हते. वर्गात हत्या होते शिक्षक काय करतात? आता मी कोणाकडे पाहू असे म्हणत त्यांनी एकच आक्रोश केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.