Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयपीएस राकेश ओला यांनी अमरावती पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला अवैध धंदे वाल्यांना दिला इशारा

आयपीएस राकेश ओला यांनी अमरावती पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला 
अवैध धंदे वाल्यांना दिला इशारा   

संभाजी पुरीगोसावी
अमरावती : खरा पंचनामा

अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून राकेश ओला यांनी अमरावती पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर  मावळते पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची अवघ्या 8 महिन्यांत बदली करण्यात आली आहे. मावळते पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनीही अमरावती पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेतल्यापासून नेहमीच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले. 

आयपीएस अधिकारी राकेश ओला यांची 13 डिसेंबरला अमरावती पोलीस आयुक्त म्हणून बदली आदेश जारी करण्यात आला होता. सध्या पोलीस खात्यात आता हळुवार बदल्यांचे वारे चांगलेच वाहू लागले आहे. राकेश ओला यांनी यापूर्वी अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक तर नागपूर, बृहन्मुंबई अशा विविध ठिकाणी उत्कृंष्ट सेवा दिली आहे. आयपीएस अधिकारी राकेश ओला हे 2012 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. सप्टेंबर 2014 मध्ये नगर जिल्ह्यात श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली होती. त्यावेळी त्यांनी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीने नगरसह संपूर्ण राज्यांत चांगलाच हैदौस घातला होता. या टोळीचा त्यांनी छडा लावला होता. त्यांची अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांची ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आचारसहिंता लागू होण्याआधींच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या तडकाफडकी बदली करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. 

निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था आणि कडक अंमलबजावणीसाठी आयपीएस अधिकारी राकेश ओला यांची ही नियुक्ती अमरावतीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आणि आयपीएस अधिकारी म्हणून राकेश ओला यांना पोलीस खात्यात ओळखले जाते. नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पदभार घेताच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राकेश ओला म्हणाले, मी अमरावती पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. या ठिकाणी अवैध धंदे वाल्यांची गई केली जाणार नाही, कायद्यात कोणालाही माफी नाही, अमरावतीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.