Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अधिवेशन संपताच उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्काअखेर तेजस्वी घोसाळकरांचा पक्षाला जय महाराष्ट्र

अधिवेशन संपताच उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का
अखेर तेजस्वी घोसाळकरांचा पक्षाला जय महाराष्ट्र

मुंबई : खरा पंचनामा

हिवाळी अधिवेशनाचे रविवारी (ता. 14 डिसेंबर) सूप वाजले. त्यामुळे आता सर्वच राजकीय नेतेमंडळी पुन्हा एकदा जोराने जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या कामाला लागणार आहेत.

पण या निवडणुकांआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये आणि विशेषतः उत्तर मुंबईत मोठा धक्का बसला आहे. कारण, उत्तर मुंबईतील वॉर्ड क्रमांक 1 च्या माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी अखेर ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असून त्या आज सोमवारी (ता. 15 डिसेंबर) भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत दादरच्या वसंत स्मृतीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तेजस्वी घोसाळकर या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू होती. मे 2025 मध्येच तेजस्वी यांनी स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत महिला दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी याची गांभीर्याने दखल घेत त्यांची मनधरणी केली होती. ज्यानंतर त्या पक्षात कार्यरक होत्या. पण त्याच काळात त्यांचे सासरे तथा शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांनी भाजपा आणि शिवसेनेकडून तेजस्वी घोसाळकरांवर पक्षप्रवेशासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला होता. ज्यानंतर काही काळासाठी याबाबतच्या चर्चा थांबल्या होत्या. पण आता थेट तेजस्वी घोसाळकर यांनीच पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचे जाहीर केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.