Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ऐन अधिवेशनात शरद पवारांच्या आमदाराला कोर्टाचं समन्स

ऐन अधिवेशनात शरद पवारांच्या आमदाराला कोर्टाचं समन्स

नागपूर : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा आदेश काढला आहे. पावसाळी अधिवेशनात कोकाटे हे सभागृहात पत्ते खेळतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठविण्यात आली होती.

सभागृहाचे काम सुरु असताना कोकाटे हे पत्ते खेळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओमुळे आपली बदनामी झाल्याची तक्रार माणिक कोकाटे यांनी केली होती. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी रोहित पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामुळे रोहित पवार न्यायालयात हजर राहतील, का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज रोहित पवारांना न्यायालयात हजर राहायचे आहे. 

तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाइलवर पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया मीडियावर व्हायरल केल्यानंतर कोकाटे यांना विरोधकांनी धारेधर धरले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्याऐवजी रमी खेळत असल्याचा आरोप करत विरोधक कोकाटेंवर तुटुन पडले होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. यावरुन सभागृहात गदारोळ झाला होता.

मला रमी खेळताच येत नाही. मी केवळ आलेली जाहिरात स्कीप करत होतो, तेवढ्यात कुणीतर व्हिडीओ काढल्याचे काकोटे यांनी स्पष्टीकरण दिले होते. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. या दरम्यान शेतकऱ्यांबद्दलही त्यांचे वादग्रस्त विधान समोर आलं होतं. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंना समज दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.

कोकाटेंचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ त्यांचा अंगलट आल्याने त्यांना क्रीडा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणामुळे त्यांचे कृषीमंत्री काढून घेऊन त्यांच्याकडे क्रीडा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. हाच युक्तीवाद कोकाटेंनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत केला होता. रोहित पवारांनी व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने आपले कृषीपद गेले, माझ्या वैयक्तीक प्रतिमेला आणि पक्षाला मोठा धक्का बसला, असा युक्तीवाद कोकाटेंनी न्यायालयात केला आहे.

रोहित पवार हे विधान परिषद सदस्य नसतानाही त्यांना व्हिडिओ कसा मिळाला, असा प्रश्न कोकाटे यांनी न्यायालयात उपस्थित केला आहे. उद्या कोकाटे-पवार यांच्याकडून न्यायालयात काय दावे-प्रतिदावे होतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.