कर्मवीर पतसंस्था सांगलीस बोगस धनादेश दिल्या प्रकरणी सांगलीवाडी येथील कर्जदारास शिक्षा
सांगली : खरा पंचनामा
बोगस धनादेश देवून पतसंस्थेची फसवणूक केले प्रकरणी रामदास रघुनाथ पाटील (रा. सांगलीवाडी, ता, मिरज, जि. सांगली) यांना सहा महीने कैद व फिर्यादी पतसंस्थेस नुकसान भरपाई रक्कम म्हणून दोन लाख रुपये देण्याचे आदेश सांगली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. खुळपे यांनी दिला आहे. तसेच आरोपी रामदास रघुनाथ पाटील विरूध्द भारतीय नागरी सुरक्षा संहीता कलम 458 (2) प्रमाणे जेल वॉरन्ट काढण्याचा आदेश दिला.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था सांगलीच्या खणभाग शाखेतून रामदास पाटील यांनी 1 लाख 25 हजारांचे कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या फेडीपोटी आरोपी यांनी फिर्यादी पतसंस्थेस बोगस धनादेश दिला होता, पतसंस्थेने सदर धनादेश भरला असता तो न वठता परत आला.
या प्रकरणी आरोपी रामदास रघुनाथ पाटील यांचे विरूध्द सांगली येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात पतसंस्थेने फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी होवून आरोपी रामदास रघुनाथ पाटील यांना वरील प्रमाणे शिक्षा झाली. पतसंस्थेच्या वतीने अॅडव्होकेट जयवर्धन एन. चौगुले यांनी काम पाहीले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.