Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विधानभवन राडा प्रकरण; आव्हाड अन् पडळकरांच्या कार्यकर्त्यांना जोरदार झटका, कारावासासह आवारात येण्यास बंदी...

विधानभवन राडा प्रकरण; आव्हाड अन् पडळकरांच्या कार्यकर्त्यांना जोरदार झटका, कारावासासह आवारात येण्यास बंदी...

नागपूर : खरा पंचनामा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या लॉबीत तुंबळ हाणामारी झाली होती. आज समितीचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला.

समितीने आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते सर्जेराव टकले यांना दोन दिवस दिवाणी कारावासाच्या शिक्षेची शिफारस केली आहे. त्याचप्रमाणे मुंबईसह नागपूर विधानभवनाच्या आवारात प्रवेश करण्यासही दोघांवर बंदी घालण्याची शिफारस समितीने केली आहे.

विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विधानसभेत अहवाल सादर केला. ते म्हणाले, नितीश देशमुख आणि सर्जेराव टकले यांच्यातील धक्काबुक्कीमुळे विशेषाधिकार भंग व अवमानप्रकरणी विशेषाधिकार समितीने याप्रकरणी दहा बैठका घेतल्या. देशमुख व टकले यांचे साक्षपुरावे नोंदविले. सर्व बाबींचा विचार करून विधानभवनसारख्या प्रतिबंधित ठिकाणी गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना पडताळणी न करता प्रवेश देणे गंभीर आहे. त्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी, अशी शिफारस समितीने केली आहे.

विधानभवनाच्या आवारात प्रभावी सुरक्षाव्यवस्था निर्माण करण्यात यावी. देशमुख आणि टकले या दोघांनाही दिवाणी कारावासाची शिक्षा देण्यात यावी, तसेच त्यांना मुंबई आणि नागपूर विधिमंडळाच्या आवारात येण्यास २०२९ पर्यंत बंदी घालण्याची शिफारस समिती करत असल्याचे भोंडेकर यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.