Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एसडीपीओ बापूराव दडस हे पीआय नारायण देशमुख यांना वाचवत असल्याचा पत्नी अक्षदा रणदिवे यांचा गंभीर आरोपपोलीस हवालदार निखील रणदिवे प्रकरण

एसडीपीओ बापूराव दडस हे पीआय नारायण देशमुख यांना वाचवत असल्याचा पत्नी अक्षदा रणदिवे यांचा गंभीर आरोप
पोलीस हवालदार निखील रणदिवे प्रकरण

लोणी काळभोर : खरा पंचनामा

यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस हवालदार निखील कैलास रणदिवे हे शुक्रवारी (ता.5) दुपारी तीन वाजल्यापासून गायब झाले आहेत.

गायब होण्यापूर्वी निखील रणदिवे यांनी आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहिली आहे. या घटनेला 40 तास उलटूनदेखील अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.

पोलीस प्रशासनाने त्यांचा तत्काळ शोध घ्यावा. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे नारायण देशमुख यांना वाचवीत आहेत. असा गंभीर आरोप निखील रणदिवे यांची पत्नी अक्षदा यांनी केला असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

अक्षदा रणदिवे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात असे म्हटले की, यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी निखील रणदिवे यांना मागील एक वर्षांपासून वारंवार मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत केले. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे नारायण देशमुख यांना वाचवीत आहेत. अद्याप 40 तास होऊन देखील मिळून येत नाहीत.

दरम्यान, या तक्रारी अर्जाची सविस्तर चौकशी करावी. पोलीस प्रशासनाने निखील रणदिवे यांचा शोध घ्यावा. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्याकडून तपास काढून घेऊन दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तपास द्यावा. या प्रकरणात दोषी असलेल्या पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर कारवाई करावी. व आम्हाला न्याय द्यावा. अशी मागणी अक्षदा रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.