Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल! अजित पवारांनी दौरे रद्द केले, फडणवीसांची घेतली भेट

माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल! 
अजित पवारांनी दौरे रद्द केले, फडणवीसांची घेतली भेट

मुंबई : खरा पंचनामा

ऐन माहापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसलाय. कोर्टाने मंत्रि माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली.

त्यानंतर राज्याच्या राजकारणात कोकाटेंना अटक होणार, याची चर्चा सुरू झाली. राजकीय वातावरण तापले असतानाच क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचा फोन बंद असल्याचे समोर आलेय. तर दुसरीकडे अजित पवार यांनी आजचे सर्व दौरे रद्द केले. अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. माणिकराव कोकेटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत जोरदार धक्का बसू शकतो. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे बोलले जातेय.

नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली. त्या निकालानंतर मंत्री कोकाटे नॉट रीचेबल आहेत. त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही. त्यांचा फोनही बंद असल्याचे समोर आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे. अटक वॉरंट निघाल्यास कोकाटे यांना अटक होऊ शकते, असे बोलले जात आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार, कोकाटे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

१९९५ च्या प्रकरणात कोर्टाने मंत्री माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. कोकाटे यांचे दुसऱ्यांदा मंत्रिपद धोक्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री माणिकराव कोकटे यांचं आज अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कोट्यातून कोकाटे बंधूंनी सदनीका लाटल्याचं प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अटक वॉरंट प्रकरणात थोड्याच वेळात सुनावणीला सुरूवात होणार आहे.

इकडे माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल आहेत, तर दुसरीकडे अजित पवार यांनी आजचे आपले सर्व नियोजित दौरे रद्द केले आहेत. अजित पवार यांचा आज नांदेड दौरा होता. पण त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये कोकाटे यांच्या अटकेवर चर्चा झाल्याचे समजतेय. त्याशिवाय मंत्रिमंडळात नवाब मलिक यांना घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहितीही खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीवेळी कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार फटका बसू शकतो.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.