Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोरक्षकांसारखे कबुतररक्षक तयार करणारजैन मुनींचे मराठी माणसाला आव्हान, म्हणाले, भेंडी बाजारात जाऊन मराठीचा आग्रह धरा

गोरक्षकांसारखे कबुतररक्षक तयार करणार
जैन मुनींचे मराठी माणसाला आव्हान, म्हणाले, भेंडी बाजारात जाऊन मराठीचा आग्रह धरा

मुंबई : खरा पंचनामा

जैन मुनी निलेशचंद्र यांनी मुंबईत कबुतर रक्षक तयार करण्याचा निर्धार केला आहे. मराठी माणसाने भेंडी बाजारात जाऊन मराठीचा आग्रह धरावा, असे आव्हान देखील त्यांनी दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात आले.

आरोग्याच्या दृष्टीने कबुतराखाने हानीकारक असल्याचे कोर्टाने म्हटले होते. यानंतर जैन धर्मीय आणि जैन साधूंनी आक्रमक पवित्रा घेतला. कबुतरखाने पुन्हा सुरु करण्यासाठी आंदोलने झाली. मात्र कोर्टाच्या आदेशामुळे दादरसह मुंबईतील कबुतरखाने बंद ठेवण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा जैन साधू निलेशचंद्र मुनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोरक्षकांप्रमाणे आम्ही कबुतररक्षक तयार करु, असा दावा निलेशचंद्र यांनी केला आहे. यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

जैन धर्मिय निलेशचंद्र मुनी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत कबुतरखान्यांवरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. निलेशचंद्र मुनी यांनी मुंबईत कबुतरखान्यांसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, कबुतरखान्याचा मुद्दा हा जीवदयेशी संबंधित आहे. प्रत्येक इमारतीत जाऊन आम्ही जैन समाजाला संघटीत करत आहोत. दादर कबुतरखान्याजवळ आम्ही उपोषण करणार आहोत. जे प्राण्यांचा विचार करतात, त्यांनाच आम्ही मुंबई महापालिकेत निवडून देणार असल्याचे त्यांनी म्हटले.

दादर येथील कबुतरखाने सुरु करण्यासाठी सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा आग्रही होते. मात्र निलेशचंद्र यांनी ते आमच्यासोबत नसल्याचा दावा केला आहे. जैन समाज आमच्यासोबत आहे. आम्ही घरोघर जाऊन जागृती करु आणि दादर येथे उपोषण सुरु करणार असल्याचे ते म्हणाले. निलेशचंद्र यांनी सांगितले की, मी अमरावतीचा आहे. आम्ही अमरावतीमध्ये गोरक्षक तयार केले आहेत. त्याचप्रमाणे आता मुंबईत कबुतररक्षक तयार करणार असा दावा त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, माझे 10-15 गोरक्षक जखमी झाले आहेत.

ते म्हणाले की, आम्ही राजस्थानी लोक महाराष्ट्राचा सन्मान अधिक करतो. तुम्हाला मराठी भाषेचा सन्मान आहे तर भेंडी बाजारात जा, असे आव्हान त्यांनी मराठी भाषिकाना दिले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.