भाजपाने चक्क सोनिया गांधींना दिली उमेदवारी...
काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात लढणार निवडणूक
कोची : खरा पंचनामा
महाराष्ट्राप्रमाणेच केरळमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकींचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीत भाजपाने चक्क सोनिया गांधी नावाच्या महिलेला निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. ही महिला आता काँग्रेसच्या उमदेवाराविरोधात निवडणूक लढणार आहे. विशेष म्हणजे ही महिला पूर्वी काँग्रेस पक्षात होती. आता तिने भाजपात प्रवेश केला आहे. या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
मलयाळी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुन्नार येथील पंचायत निवडणुकीत भाजपाने नल्लाथन्नी वार्डमधून ३४ वर्षीय सोनिया गांधी नावाच्या महिलेला उमेदवारी दिली आहे. ही महिला स्थानिक काँग्रेस नेते दुरे राज यांची मुलगी आहे. राज यांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं. त्यानंतर आता सोनिया यांनी राजकारण येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाची निवड केली आहे
सोनिया गांधी यांचे पती भाजपाचे नेते आहेत. त्यांचे पती सुभाष हे पंचायतचे भाजप महासचिव आहेत. तसेच त्यांनी ओल्ड मुन्नार मुलक्कड़ येथून पोटनिवडणूकही लढवली आहे. लग्नानंतर काही काळातच सोनिया गांधीही सक्रियपणे भाजपात सामील झाल्या. ही त्यांची पहिली निवडणूक आहे. त्यांचा सामना आता काँग्रेसच्या मंजुळा रमेश आणि सीपीआयएमच्या वालरमति यांच्याशी होणार आहे.
कोचीतील असमन्नूर गावातील पंचायत निवडणुकीत ९० वर्षीय ज्येष्ठ उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या मते वय ही केवळ एक संख्या आहे. ते उत्साहाने या निवडणुकीत सहभागी झाले आहेत. ते घरोघरी जात मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहे. दर या निवडणुकीचा निकाल १३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. यामध्ये ९४१ ग्राम पंचायत, १५२ ब्लॉक पंचायत, १४ जिल्हा परिषद, ८७नगरपालिका आणि ६ महापालिकांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.