Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवारांनी मोडून काढला पुतण्याचा डाव

शरद पवारांनी मोडून काढला पुतण्याचा डाव

पुणे : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातील पुणे महानगरपालिका निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चा शुक्रवारी फिसकटल्या. अजित पवारांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवण्याची आणि केवळ 35 जागा देण्याची अट घातल्याने ही बैठक अयशस्वी ठरली. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांसोबत संपर्क साधून स्वतंत्र बैठक घेतली.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र येऊन 'घड्याळ' चिन्हावरच निवडणूक लढवावी, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आग्रह अमान्य करून 'राष्ट्रवादी काँग्रेस शप' ही अप्रत्यक्षपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी मोडून काढला. त्यामुळे पुण्यात दोन्ही 'राष्ट्रवादी' एकत्र येण्याची चर्चा फिस्कटली असून आता पुन्हा महाविकास आघाडी म्हणून पुण्यात लढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी खासदार वंदना चव्हाण आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्यात जागावाटपावर चर्चा झाली. मात्र, अजित पवारांनी सर्व उमेदवारांनी पक्षाच्या 'घड्याळ' चिन्हावरच निवडणूक लढवावी, अशी अट घातली. तसेच, शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 35 जागा देण्याचा प्रस्तावही त्यांनी दिला. हा प्रस्ताव मान्य होणे शक्य नसल्याने शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी बैठकीतून बाहेर पडले.

यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी बोलणी सुरू केली. रास्ता पेठेतील एका हॉटेलमध्ये या तिन्ही पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अंकुश काकडे, आमदार बापू पठारे, विशाल तांबे, अश्विनी कदम, मनाली भिलारे उपस्थित होते. दुसरीकडे, काँग्रेसकडून पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, अभय छाजेड व ठाकरेंच्या शिवसेनेकडून शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे व वसंत मोरे यांनी हजेरी लावली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बोलणी कुठपर्यंत पोहोचली, याचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.