Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपच्या राज्यमंत्र्याच्या सख्ख्या भावाला गांजा तस्करी प्रकरणी अटक

भाजपच्या राज्यमंत्र्याच्या सख्ख्या भावाला गांजा तस्करी प्रकरणी अटक

भोपाळ : खरा पंचनामा

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात गांजा तस्करी प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आढळून आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केलीय तर तिसरा आरोपी गांजा तस्करी प्रकरणी आधीच तुरुंगात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सतना जिल्ह्यातील रामपूर बघेलान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई करत गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली. अनिल बागरी आणि पंकज सिंह अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण ४६ किलो १३४ ग्रॅम गांजा जप्त केला. याची किंमत ९ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी पकडण्यात आलेला मुख्य आरोपी अनिल बागरी हा मध्य प्रदेश सरकारमधील राज्य मंत्री प्रतिमा बागरी यांचा सख्खा भाऊ आहे.

पोलिसांनी रात्री उशीरा मोड परिसरात संशयास्पद हालचालीची माहिती मिळताच कारवाई केली. एका पत्र्याच्या शेडमध्ये लपवलेली गांजाची पॅकेट सापडली. गांजाची पाकिटं लपवण्यासाठी त्याच्यावर इतर साहित्य भरलेली पोती ठेवण्यात आली होती. गांजा तस्करीचं मोठं रॅकेट यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पंकज सिंह आणि अनिल बागरी यांना अटक केली. तर तिसरा आरोपी शैलेंद्र सिंह उर्फ सोम राजावत याचं नाव चौकशीत समोर आलंय. त्याला काही दिवसापूर्वीच गांजा तस्करी प्रकरणी अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, नियोजनबद्ध पद्धतीने या प्रकरणी कारवाई केलीय. आम्हाला गांजाच्या तस्करीची माहिती मिळाली होती. छापा टाकला असता ४६ किलो गांजाची पॅकेट्स सापडली. पंकज सिंहने अनिल बागडी आणि शैलेंद्र राजावत यांच्याकडन गांजा आणल्याचं मान्य केलंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.