Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नृसिंहवाडीत दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

नृसिंहवाडीत दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

नृसिंहवाडी : खरा पंचनामा 

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात आज दत्त जयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. पहाटेपासूनच देशभरातील दत्त भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून, रांगा तीन ते चार तास लांबल्या आहेत. 

गुरुदेव दत्तांचे अवतार नरसिंह सरस्वती यांनी १२ वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केल्यामुळे नृसिंहवाडीला दत्त भक्तांमध्ये विशेष महत्त्व आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेल्या या मंदिरात दर्शनापूर्वी भाविक पवित्र स्नानासाठी येतात. मंदिर देवस्थान समितीने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. दिवसभर महाअभिषेक व अन्य धार्मिक विधी पार पडणार असून, सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मकाळ सोहळा उत्साहात साजरा होईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.