Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महापालिकांच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आयोगाने दिले संकेत

महापालिकांच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आयोगाने दिले संकेत

मुंबई : खरा पंचनामा

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (15 डिसेंबर) महानगरपालिका क्षेत्रासाठी निवडणूक जाहीर केली. 15 जानेवारीला याबाबत निवडणूक होणार असून 16 जानेवारीला याचे निकाल समोर येणार आहेत. नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका होणार असून याबाबत घोषणा झाली. पण, अद्यापही जिल्हा परिषदेतील निवडणुकीबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. पण, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संकेत दिले आहेत.

पत्रकार परिषदेत आयुक्त म्हणाले आहेत की, "सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानुसार, ज्या जिल्हा परिषद पंचायत समितींचे 50 टक्क्यांच्या आत आरक्षण आहे, तिथे निवडणूक घ्या. पण, अशा फक्त 12 जिल्हा परिषद आहेत. या 12 जिल्हा परिषदांचे नियोजन आम्ही करत आहोत. पण आमची अडचण अशी आहे की, जशा विधानसभा किंवा लोकसभांच्या निवडणुका असतात त्यापेक्षा गुंतागुंतींच्या निवडणुका असतात. यावेळी मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची गरज निवडणूक आयोगाला भासते. ज्या जिल्हा परिषदा या 50 टक्क्याच्या आत आहेत, त्यामध्ये महानगरपालिकादेखील आहेत. अशावेळी अधिकाऱ्यांची कमतरता भासत असून आम्ही ते नियोजन करत आहोत. त्यानंतरच आम्ही जिल्हा परिषद निवडणुका घेऊ शकतो. आम्हाला 31 जानेवारी पूर्वी या निवडणुका घ्यावाच लागणार आहेत." असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार, महापालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा ही 31 जानेवारी आधीच होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी पूर्वी कोणत्याही परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, आयोगाने नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता मनपा निवडणूकदेखील जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुक होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सर्वाच्च न्यायालयाने 31 जानेवारी आधी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. पण आरक्षणामुळे 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पेच निर्माण झाला. त्यामुळे या निवडणुका जानेवारीमध्ये ढकलल्या. 21 जानेवारी रोजी आरक्षणावर न्यायालयात सुनावणी होणार असून त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.