Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घायल हू इसलिये घातक हू!

घायल हू इसलिये घातक हू!

अकलूज : खरा पंचनामा

अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मोठा विजय मिळवला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात अकलूज नगरपालिकेची निवडणूक लढवण्यात आली होती.

या विजयानंतर बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा लगावला. घायल हू इसलिये घातक हू असे म्हणत धुरंदर चित्रपटातल्या या गाजलेल्या डायलॉगचा उच्चार करत भाजपवर टीका केली. निवडणुकीच्या काळात भाजपकडून विशेषतः माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज नगरपालिकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विजय मिळवल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरगार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तयारीला लागण्याचे आवाहनही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.

अकलूज नगरपालिकेच्या विजयानंतर कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर तुफानी टोलेबाजी केली. भाजपचा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा अकलूज करमाळा कुडूवाडी आणि सांगोला अशा सहा ठिकाणी भाजपचा दणदणीन पराभव झाला आहे. याचाच संदर्भ घेत सोलापूर जिल्हा हा स्वाभिमानी आहे, कोणाची हुकूमशाही चालवू देत नाही आणि त्यामुळेच लोकसभा विधानसभा आणि आता नगरपालिकेत सलग तिसऱ्यांदा भाजपाला सणकून दणका दिला असल्याची आठवण धैर्यशील मोहिते पाटील यांनी करुन दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.