Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयुक्तांच्या नावाने एसीपींना दम; पोलीस आयुक्तांच्या PRO सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन

आयुक्तांच्या नावाने एसीपींना दम; पोलीस आयुक्तांच्या PRO सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन

पुणे : खरा पंचनामा

पुणे जनसंपर्क अधिकारी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे पीआरओ सहायक पोलीस फौजदार प्रवीण घाडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू झाली असून, सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

पुणे पोलीस आयुक्तांचे नाव सांगत एसीपीना फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न घाडगे यांनी केला होता. आंदेकर टोळीशी संपर्कात असलेला बिल्डर अविनाश पवार याला जमिनीच्या वाद प्रकरणात मदत मिळावी, यासाठी हा दबाव टाकला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्याने कोणतीही मदत करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी याबाबत पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिला.

त्यानुसार 'स्टेनली' नावाचा मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाले. तो थेट घाडगे यांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने स्टेनलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. घाडगे यांनी प्रकरण मिटवण्यासह तडजोडीसाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याचे स्टेनलीने कबूल केले.

तसेच आंदेकर टोळीशी संबंधित अविनाश पवार याचे प्रकरण घेऊन घाडगे यांच्याकडे गेल्याची कबुलीही दिली. घाडगे यांच्याविरोधात यापुर्वीही पोलीस आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून प्रकरणे मिटवण्याचा दबाव टाकत असल्याचे स्पष्ट झाले होते. तक्रारीनंतर त्यांची 'भरोसा सेल' मध्ये बदली केली होती. मात्र तरीही त्यांच्या कृत्यांना आळा बसला नाही. पीआरओ पदाचा गैरवापर करून सातत्याने अनैतिक व बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी झाल्याने यांचे निलंबन केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.