Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पार्थ पवार अचानक शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या भेटीला

पार्थ पवार अचानक शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या भेटीला

पुणे : खरा पंचनामा 

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार गोविंद बागेत पोहोचले आहेत. सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे ठामपणे सांगितले होते. या पत्रकार परिषदेनंतर लगेच पार्थ पवार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यातील मोदी बागेत पोहचले आहेत. पार्थ पवार-शरद पवार यांच्यामध्ये आता नेमकी काय चर्चा होतेय? याकडे राज्याचे लक्ष लागलेय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. त्याआधी राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामधेही भेट झाली आहे. एकीकडे पार्थ पवार हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. तर दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचीही भेट होत आहे. तटकरे आणि पटेल यांनीही सुनेत्रा पवार यांची एकत्र भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.