Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाहतूक पोलिसाला गणवेश फाटेपर्यंत मारहाण, पोलीस अत्यवस्थनूतन नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी

वाहतूक पोलिसाला गणवेश फाटेपर्यंत मारहाण, पोलीस अत्यवस्थ
नूतन नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी

कल्याण : खरा पंचनामा

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात शनिवारी रात्री तुफान वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी सोडविण्याचा कल्याणचे वाहतूक पोलीस प्रयत्न करत होते. यावेळी एका नगरसेवकाचे समर्थक असलेले तीन राजकीय कार्यकर्ते बसलेली एक मोटार वाहतूक कोंडीला न जुमानता उलट मार्गिकेतून दुर्गा माता चौकातून कोनगावच्या दिशेने चालकाकडून नेण्यात येत होती.

या वाहन चालकाला उलट मार्गिकेतून वाहन नेण्यास मी मज्जाव करताच, सदर वाहनातील तीन इसमांनी आपणास शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत वाहतूक हवालदार विलास सुरेश भागीत (३३) यांचा गणवेश फाटला.

या मारहाणप्रकरणी वाहतूक हवालदार विलास भागीत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एमएच ०५ सीए ०४०० या मोटारीतील तीन इसमांविरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली आहे. हे तिन्ही इसम कल्याणमधील एका सत्ताधारी नगरसेवकाचे समर्थक असल्याची चर्चा आहे. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता नगरसेवकांचा दहा वर्षांनी उदय झाला आहे. या नगरसेवकांच्या मागे मिरविणारे काही कार्यकर्ते (पंटर) स्वतला नगरसेवक समजून आता शहरात धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात कल्याणमध्ये दुर्गाडी चौक परिसरात एका वाहतूक हवालदाराला मारहाण करून झाली आहे.

हवालदार भागीत यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, मी शनिवारी रात्री दुर्गाडी किल्ला भागातील दुर्गामाता चौकात वाहतूक सेवक पी. पी. गायकवाड, प्रतिक पवार यांच्या सोबत वाहतूक नियमनाचे काम करत होतो. कोनगाव कडून कल्याणमध्ये दुर्गामाता चौकाकडे येणारी मार्गिका वाहतूक कोंडीने जाम होती. ती कोंडी सोडविण्यासाठी मी सहकाऱ्यांसह प्रयत्न करत होतो. कोनगावाकडून येणारी वाहने मी रोखून धरून कोंडी सोडवत होता. त्यावेळी वाडेघर चौकाकडून येणारा एमएच ०५ सीए ०४०० या मोटारीचा वाहन चालक उलट मार्गिकेतून कोनगावकडे जाऊन कोंडीत आणखी भर घालण्याचा प्रयत्न करत होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.