नव्या पोलीस महासंचालकांबद्दल माजी गृहमंत्र्यांचे लक्षवेधी ट्विट!
नागपूर : खरा पंचनामा
रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालक असताना त्यांच्याच कार्यकाळात राज्याचे माजी गृहमंत्री राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली होती.
१०० कोटी रुपयांची वसुली आणि मनी लाँड्रिंग सारखे गंभीर आरोप त्यांच्यावर झाले होते. शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमुळे ही कारवाई झाल्याची ओरड त्यावेळी झाली होती. त्यामुळे आता शुक्ला या निवृत्त होताच, त्याच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची वर्णी लागली आहे. त्यांनी या पदाचा कार्यभार स्विकारताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हायरल केलेल्या पोस्टची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. देशमुख यांनी आपल्या स्वतःच्या एक्स ट्विटर हँडलरवरून केलेली ही पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे.
देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये ज्या पद्धतीने दाते यांचा उल्लेख केला आहे, ते पहाता माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात राज्यात परिस्थिती वेगळीच होता, का असा दबका सवालही त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालक असताना देशमुख यांच्यासोबतच नवाब मलिक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील शुक्ला या राज्य सरकारसाठी फोन टॅपिंग करतात, असे गंभीर आरोप केले होते.
मधल्या काळात शुक्ला या सरकारच्या ट्रू कॉलर आहेत, असा आरोपही झाला होता. त्यामुळे सदानंद दाते यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा भार स्विकारल्याच्या अगदी काही मिनिटांत माजी गृहमंत्री देशमुख यांनी केलेल्या या पोस्टची नेटकऱ्यांमध्ये खुसखुशीत चर्चा सुरू झाली आहे.
आपल्या एक्स ट्विटर हँडलरवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जी पोस्ट केली आहे, त्याची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे. दाते यांच्यावर केलेल्या कौतुकाच्या वर्षावात माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात, सदानंद दाते यांची पोलीस दलात प्रामाणिक, कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ख्याती आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्या बद्दल आपले अभिनंदन. राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांची सुरक्षा आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या संरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या राज्याच्या पोलीस दलाला आपल्या रुपात नवा आयाम मिळेल, असा विश्वास आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.