Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जिल्हा परिषद निवडणुकांतही भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न' सुरूच

जिल्हा परिषद निवडणुकांतही भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न' सुरूच

सिंधुदुर्ग : खरा पंचनामा

राज्यात भाजपने (BJP) महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा बिनविरोध जिंकल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली होती. महापालिका निवडणुकीत राज्यात जवळपास 70 बिनविरोध नगरसेवक निवडून आले होते.

त्यामध्ये सर्वांधिक भाजपचे, त्याखालोखाल शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध होते. त्यामुळे, भाजपला लोकशाही संपवायची आहे, निवडणूक प्रक्रियाच संपवायची आहे अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. आता, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही भाजपचा बिनविरोध निवडणुकांचा पॅटर्न पाहायला मिळत असून उमेदवारी अर्ज मागे घेतले जात असल्याचं दिसून येत आहे. कारण, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निडणुकीतून भाजपने बिनविरोधचं खातं खोललं आहे.

भाजपने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी बिनविरोधच्या माध्यमातून खातं खोल आहे. भाजपने खारेपाटण जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्राची इस्वालकर यांच्या माध्यमातून पहिली निवड बिनविरोध केली आहे. येथे ठाकरे सेनेला मोठा धक्का दिलाय. उबाठा सेनेच्या खारेपाटण जिल्हा परिषदेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच, भाजपचा दुसरा उमेदवारही बिनविरोध झाल्याची माहिती आहे. येथील बांदा जिल्हा परिषदेतून भाजपचे उमेदवार तथा माजी सभापती प्रमोद कामत हे बिनविरोध निवडून आले आहेत. येथील जिल्हा परिषदेच्या गटातून अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रमोद कामत बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाजपने 2 बिनविरोध उमेदवार विजयी केल्याचं पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी आहे. त्यामुळे, 27 जानेवारीलाच निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, तत्पूर्वी प्रतिस्पर्धी उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडून भाजपकडून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही बिनविरोधचा पॅटर्न राबवला जात असल्याचे दिसून येते. राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामध्ये, 27 जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.