'कोर्टाने आदेश दिला म्हणून शरण आलो'
जामीनावर बाहेर येताच मंत्रिपुत्राची पुन्हा 'दादागिरी'
महाड : खरा पंचनामा
महाड नगरपालिका निवडणुकीत मतदानावेळी मतदान केंद्रावर राडा केल्यानं मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणी कोर्टाने फटकारल्यानंतर विकास गोगावलेंसह १३ जण पोलिसाना शरण गेले होते. त्यांची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आता दोन दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर तुरुंगातून सुटका झालीय. यानंतर विकास गोगावले राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहताना दिसतायत.
विकास गोगावले यांनी जामीनावर बाहेर येताच बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांना डिवचलं आहे. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणार नाहीय न्याय देवतेनं आदेश दिला म्हणून मी शरण गेलो असं विकास गोगावले म्हणालेत.
महाड नगरपालिका निवडणुकीवेळी राडा झाल्यानंतर विकास गोगावले हे फरार झाले होते. दीड महिन्यापेक्षा अधिक काळ बेपत्ता राहिल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी फटकारलं होतं. शेवटी विकास गोगावले पोलिसांसमोर शरण आला होता. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती.
दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर विकास गोगावले यांना जामीन मंजूर झाला. जामीन मिळताच मुलगा बाहेर आल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विकास गोगावले यांनी पुन्हा आक्रमक विधान केलंय.
विकास गोगावलेच्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावलेचं रक्त आहे. कार्यकर्त्यांच्या वाट्याला गेलात तर मला सहन होत नाही. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही. न्याय देवतेनं आदेश दिला म्हणून मी शरण गेलो असं विकास गोगावलेंनी म्हटलयं.
महाड नगरपालिका निवडणुकीत मतदानच्या दिवशीच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. २ डिसेंबरला झालेल्या राड्यानंतर सर्व आरोपी फरार होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने जामीनासाठी दाखल केलेला अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावत पोलिसांवर ताशेरे ओढले होते. मंत्री पुत्राला तातडीने हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर आरोपींचे धाबे दणाणले होते. शेवटी सर्वच आरोपी पोलिसांना शरण आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.