शिवसेना कुणाची? पुन्हा तारीख पे तारीख
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला पुढची सुनावणी
नवी दिल्ली : खरा पंचनामा
शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) यांच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.
सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (२१ जानेवारी) होणारी ही सुनावणी आता शुक्रवारी, २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पार पडणार आहे. सरन्यायाधीश सुर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने पुढील तारीख दिली आहे. महत्वाचं म्हणजे याच दिवशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची जयंती आहे.
सरन्यायाधीश सुर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 23 जानेवारी रोजी सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले. शिवसेनेचे प्रकरण बुधवारी कार्यतालिकेत 37 व्या क्रमांकावर सूचीबद्ध करण्यात आले होते. मात्र बुधवारी पुन्हा सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.