जामीनसाठी मदत भोवली : वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित
नवी मुंबई : खरा पंचनामा
एका फसवणुकीच्या तक्रार अर्जाची चौकशी न करता अर्ज परस्पर दप्तरी दाखल करीत आरोपींना जामीन मंजूर व्हावा यासाठी मदत केल्याचे उघड झाल्याने नेरुळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना निलंबित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ही फसवणुकीची तक्रार आली होती. या अर्जाची नव्याने चौकशी केली असता फसवणूक करणाऱ्यांवर अनेक गुन्हे इतर पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर आले होते
युनुस कासम सोत यांच्यासोबत उमेश मनहरलाल उधानी यांनी कोर्ट बॉन्ड पेपरप्रमाणे भूखंड तडजोड करार केला होता. मात्र, कराराप्रमाणे भूखंड अथवा अर्जदार यांनी विश्वासाने दिलेले पैसे आणि त्याबदल्यात अर्जदार यांना कोणतीही मालमत्ता अथवा मोबदला न देता फसवणूक केली होती. या प्रकरणी 4 सप्टेंबर 2025 रोजी तक्रार अर्ज नेरुळ पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दिला होता. मात्र, या अर्जाची सखोल चौकशी न करता दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी परस्पर दप्तरी दाखल केला होता.
या अर्जाच्या सखोल चौकशी केली असता यात गुन्हा दाखल केला नसल्याचे समोर आले. याचा फायदा घेत फसवणूक करणाऱ्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधंडाधिकारी, बेलापूर येथे अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता. यावेळी स्वतः हजर न राहता दुय्यम अधिकाऱ्यास पाठवले. नाईकवाडी यांचे हे वर्तन अत्यंत बेजबाबदार, पोलीस अधिकाऱ्यास न शोभणारे व पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणार असल्याने त्यांना निलंबीत केल्याचे आदेशात म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.