Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणामहाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा सन्मान

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा
महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा सन्मान

नवी दिल्ली : खरा पंचनामा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग तसेच अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.

दरम्यान, या वर्षी महाराष्ट्रातील काही मान्यवरांनाही पद्म पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे. परभणीचे श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर यासारख्या इतरही काही मान्यवरांना हा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातीलच अर्मिडा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. परभणीचे श्रीरंग लाड यांनादेकील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ते एक शेतकरी आहेत. त्यांनी कापूस या पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केलेले आहे. त्यांच्याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यासह महाराष्ट्रातीलच भिकल्या लाडक्या धिंडा यांनादेखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. हे पुरस्कार तीन प्रकारचे असतात. पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री असे हे तीन पुरस्कार आहेत. कला, समाजकार्य, प्रशासन, विज्ञान, व्यापर, उद्योग, आरोग्यसेवा, साहित्य, शिक्षण, खेळ अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान जाहीर केला जातो.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.