"शिवसेना शिंदे गटातील गद्दारांचा एक गट भाजप आमदाराच्या खिशात"
धाराशिव : खरा पंचनामा
राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटातील गद्दारांचा एक गट भाजप आमदाराच्या खिशात असल्याचे खळबळजनक विधान माजी मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. धाराशिवमध्ये झालेल्या संकल्प मेळाव्यात त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने मात्र राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
तानाजी सावंत भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे, शिवसेनेतील एक गट भाजपसोबत युती करण्याची प्लॅनिग करत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धाराशिव जिल्ह्यातील विशेषतः कळंब, भूम आणि परंडा भाग हे राजकीय चित्र अत्यंत रंजक वळणावर असल्याचे दिसते. नगरपरिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही याचे पडसाद उमटत आहेत, हे राजकारणातील बदलत्या समीकरणांचेच द्योतक आहे.
कळंबमध्ये भाजप-शिवसेना युती पाहायला मिळाली असली, तरी भूम-परंडा मध्ये भाजपने थेट तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्वपक्षीयांशी हातमिळवणी केल्याचे दिसते. यामुळे महायुतीमध्ये 'वरिष्ठ पातळीवर एकी आणि स्थानिक पातळीवर बेकी' असे चित्र निर्माण झाले आहे. याचा परिणाम आगामी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या वेळी आणि प्रचारात दिसून येईल.
दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाले, पण त्यानंतरही भाजपकडून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ऑपरेशन लोटस सुरूच आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसचा फटका ठाकरे गटालाच बसला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांना अनेकदा ठाकरे गटातील भाजपात प्रवेश दिला आहे. नगरसपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटातील आठ ते दहा जणांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर भाजपकडून ऑपरेशन कमळ सुरूच आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात निंबाळकर आणि पाटील या दोन घराण्यांमधील संघर्ष हा नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना दिलेला हा 'धक्का' जिल्ह्याच्या राजकीय गणितात महत्त्वाचा ठरणार आहे.
सांजा, कनगरा, रामवाडी, गावसुद, बेंबळी, धारूर आणि तामलवाडी यांसारखी गावे राजकीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय मानली जातात. या गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे, हा ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यासाठी मोठा संघटनात्मक फटका आहे. हे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर मतदान खेचून आणण्याची क्षमता ठेवतात, त्यामुळे त्यांचा पक्ष सोडणे शिवसेनेच्या (UBT) स्थानिक नेटवर्कला कमकुवत करू शकते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.