सत्तेसाठी काहीही; काँग्रेसनंतर भाजपची एमआयएमशी युती
अकोला : खरा पंचनामा
राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी प्रचारसभांना वेग आला आहे. अशामध्ये महापालिकेच्या निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी अनेक युत्या आघाड्या बनल्याचे चित्र राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
पण, नुकतेच अंबरनाथमध्ये एक वेगळीच युती पाहायला मिळाली. एकमेकांचे कट्टर विरोध मानले जाणारे भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांनी अंबरनाथ महापालिकेत हातमिळवणी केल्याचे समोर आले. पण, त्यानंतर आता सत्तेसाठी भाजपने AIMIM सोबत युती केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ही आतापर्यंतची सर्वात मोठी घडामोड मानली जात आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट महानगरपालिकेत भाजपने AIMIM सोबत आघाडी करून सत्तेचा मार्ग निवडला आहे. हा निर्णय घेण्यामागे नुकतेच झालेल्या नगपपंचायत आणि नगपालिका निवडणूकीत भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या, पण, भाजपला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे हा निर्णय भाजपने घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, एकीकडे अंबरनाथमध्ये काँग्रेसशी युती केली तर दुसरीकडे बटेंगे तो कटेंगेसारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपने अकोटमध्ये थेट AIMIM सोबत आघाडी केल्याचे चर्चांना उधाण आले आहे.
अकोट नगरपालिकेमध्ये एकूण 35 जागा आहेत. त्यापैकी 33 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये भाजपला 11 जागांवर समाधान मानावे लागले होते. अशामध्ये मंगळवारी (6 जानेवारी) नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. भाजपच्या नेतृत्वातच अकोट विकास मंचाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये भाजपनंतर सर्वाधिक 5 जागा जिंकणारा एमआयएम भाजपचा मित्रपक्ष बनला आहे. बहुमतासाठी आवश्यक संख्येपासून भाजप दूर असल्याने सत्तास्थापनेसाठी भाजपने या समीकरणाचा शोध घेतला. या आघाडीत विविध राजकीय विचारसरणींचे पक्ष एकत्र आले.
फक्त AIMIM च नव्हे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष यांचा समावेश आहे. भाजपचे आमदार रवी ठाकूर हे या आघाडीचे गटनेते असणार आहेत. 13 जानेवारीला उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी ही आघाडी एकत्रित मतदान करणार आहे. माया धुळे या नगराध्यक्ष असून नगपालिकेत विरोधी पक्षात काँग्रेसचे 6 सदस्य आणि वंचितचे दोन सदस्य असणार आहेत. दरम्यान, या आघाडीची सर्वाधिक चर्चा ही महाराष्ट्रातील राजकारणात होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.