माजी खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलाय. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना संभाजीनगरमध्ये मारहाण झाली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांची कार रोखली. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कारवर धडाधड बुक्या अन् पायांनी मारहाण केली. त्याशिवाय जलील यांनाही मारहाण केली. या प्रकारानंतर संभाजनगरमधील वातावारण चांगलेच तापलेय.
छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुऱ्यात जलील यांना मारहाण झाली. एमआयएमचे कार्यकर्ते आणि एमआयएमचे नाराज कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा आणि हाणामारी झाली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज झालेली हे त्या भागातून पदयात्रा काढत होते. पदयात्रा सुरू झाल्यानंतर त्यांना विरोध होत होता. जलील त्यांच्यासमोरच हा राडा झाला. जलील यांना आधी काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर आडवले अन् हाणामारी झाली. यावेळी दोन गटांमध्ये हमारीतुमरी होऊन हाणामारी झाली. त्यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला.
2014 पासून मराठवाड्यात पाय रोवणाऱ्या, मुस्लिम बहुल भागात वर्चस्व असणाऱ्या आणि मुस्लिम बहुल भागामध्ये एकतर्फी विजय मिळवणाऱ्या एमआयएमला छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम बहुल भागातच विरोध होऊ लागला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा भागांमध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे पदयात्रा काढताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांना पदयात्रा वळवून दुसऱ्या गल्लीत घेऊन जावी लागली. त्यानंतरही काळे झेंडे दाखवणारे आणि विरोध करणारे लोक त्यांच्या मागे काळे झेंडे घेऊन फिरत होते. ज्यांनी दहा-बारा वर्ष एमआयएम साठी काम केलं, त्यांना तिकीट दिले नाही म्हणून लोक विरोध करीत असल्याची प्रतिक्रिया बंडखोरी केलेल्या आणि काँग्रेसमधून पुरस्कृत उमेदवाराचे म्हणणे आहे. तर इम्तियाज जलील यांनी सोळा तारखेला हा विरोध कळेल अशी प्रतिक्रिया दिलीय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.