Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'पडद्यामागे काय सुरू आहे, ते सध्या जाहीर करता येणार नाही'

'पडद्यामागे काय सुरू आहे, ते सध्या जाहीर करता येणार नाही'

कोल्हापूर : खरा पंचनामा

राज्यातील सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू सध्या केवळ मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे पडसाद थेट कोल्हापुरात उमटताना दिसत आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रस सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर आता सत्ता स्थापन करण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी केलेले सूचक वक्तव्य राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे ठरत आहे. 'पडद्यामागे काय सुरू आहे, ते सध्या जाहीर करता येणार नाही,' असे म्हणत त्यांनी अधिक तपशील देणे टाळले, मात्र त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापुरात काँग्रेसकडे 24 तर शिंदे गटाकडे 15 जागा आहेत. हे दोन्ही गट एकत्र आल्यास महापालिकेत स्पष्ट बहुमत सहज गाठता येऊ शकते. त्यामुळे 'मुंबईत शिंदेंना डावलले गेले, तर कोल्हापुरात काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा पर्याय खुला आहे,' अशी राजकीय गणिते मांडली जात आहेत. विशेष म्हणजे, मुंबईतील सत्ता समीकरणांवर राज्यातील इतर महापालिकांचे निर्णयही अवलंबून असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना-भाजपमध्ये जर मुंबईत काडीमोड झाला, तर त्याचे पडसाद कोल्हापूरसह अनेक शहरांमध्ये उमटू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला केवळ काठावरचे यश मिळाले. या निवडणुकीत थेट लढत काँग्रेसचे नेते सतेज पाटील विरुद्ध महायुती अशीच रंगली होती. महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचार केला, तरीही पाटील यांनी काँग्रेससाठी 34 जागा जिंकून देत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. कोल्हापूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 41 जागांची मॅजिक फिगर हवी आहे. महायुतीने मॅजिक फिगर गाठत काँग्रेसचे तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आले तर त्यांना मॅजिक फिगर गाठता येणार आहे. त्यामुळे सतेज पाटील कोल्हापुरात शिंदेंच्या साथीने गेम फिरवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.