ठाकरे शिवसेना गटनेतेपदी माजी महापौर किशोरी पेडणेकरांची निवड
मुंबई : खरा पंचनामा
माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची आज (दि. २१) शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. किशोर पेडणेकर यांच्या मुंबई महानगरपालिकेतील अनुभवववावर विश्वास दाखवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
गटनेतेपदासाठी किशोरी पेडणेकर यांच्यासोबतच माजी महापौर विशाखा राऊत आणि ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद वैद्य यांची नावे देखील चर्चेत होती. या तिन्ही नेत्यांकडे महापालिकेतील कामाचा मोठा अनुभव आहे. मात्र, मात्र बैठकीनंतर अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आक्रमक शैली आणि महापौरांच्या कार्यकाळात त्यांनी केलेली कामगिरी लक्षात घेता त्यांच्यावर ही जबाबादारी सोपविण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किशोरी पेडणेकर या वॉर्ड क्रमांक 199 मधून विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव केला होता. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला ६५ जागा मिळल्या आहेत तर ८९ जागा जिंकत भाजप हा महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकानाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1, समाजवादी पार्टीला 2 जागा जिंकल्या आहेत.
किशोरी पेडणेकर यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय प्रक्रियेला वेग आला आहे. सेनाभवन येथून शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आता एकत्रितपणे कोकण भवनाकडे रवाना होणार आहेत. या नियुक्तीचे अधिकृत पत्र आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हा लवाजमा कोकण भवनात जाणार असून, तिथे पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.