Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बँकिंग क्षेत्रातील 23 वर्षांच्या नोकरीनंतर अमृता फडणवीस यांचा राजीनामा

बँकिंग क्षेत्रातील 23 वर्षांच्या नोकरीनंतर अमृता फडणवीस यांचा राजीनामा

मुंबई : खरा पंचनामा 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी आपल्या बँकिग क्षेत्रातील नोकरीत सुद्धा सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, आता त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील या सेवेबाबद अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

23 वर्षे बँकिंग क्षेत्रात काम केल्यानंतर, अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोशल मीडियावरील एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

खरं तर, 23 वर्षांपूर्वी, अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाल्या होत्या आणि आज त्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणजेच सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ही पोस्ट करताना त्यांचे बँकेतील सहकारी तसेच बँकेचे एमडी, सीईओ अमिताभ चौधरी यांचेही आभार मानले.
"23 वर्षांपूर्वी, मी एक यंग मॅनेजमेंट ट्रेनी म्हणजेच व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून अॅक्सिस बँकेत रुजू झाले होते. आज, मी कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवृत्त होत आहे. ब्रांच म्हणजेच शाखा कामकाजापासून कॉर्पोरेट बँकिंगपर्यंत, ट्रेजरीपासून कस्टमर रिलेशन ग्राहक संबंधांपर्यंतच्या अनुभवामुळे, ही संस्था माझं कुटुंब, शिक्षक आणि दुसरं घर राहिली आहे."

"बँकेतील माझे सहकारी आणि लीडर्स, विशेषतः एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांचा, सर्व पाठिंब्याबद्दल आभारी आहे. हा सुंदर अध्याय संपत असताना, मी आयुष्यभराचे धडे आणि मैत्री घेऊन जात आहे.
धन्यवाद, अॅक्सिस बँक"

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.